सावधान.पुढील ४८ तासात तापमानवाढीचा हवामान खात्याचा इशारा

0

पुणे : राज्यात पुढील ४८ तासांत पुन्हा एकदा तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्ली वेधशाळेने इशारा दिला आहे.

राज्यात अनेक शहरांसह ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमानाने पुन्हा एकदा ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. तसेच खान्देशात ४५ अंशावर तापमान जाऊन पोहचले आहे . त्यामुळे आग ओकणार्‍या सूर्यामुळे दुपारच्या वेळेत तर अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. सायंकाळानंतरच नागरिक घराबाहेर पडणे पसंत करतात. यंदा तर उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. तापमानाने आतापर्यंतची कमाल पातळी गाठली असून, प्रचंड उष्म्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. एप्रिल महिन्यात याआधी तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.