भोगावती नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला

0

वरणगाव : शहरातील नारीमळ्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळला.

या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की शहरातील नारी मळा येथील चांभारवाड्यातील रहिवाशी विजय एकनाथ माळी (२८) हा तरूण मंगळवारच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास कामावर जातो व रात्री दहा वाजे पर्यत घरी परत येतो मात्र  तो बुधवारच्या दुपार पर्यत घरी परत आला नसल्याने त्याची आई वडिलाना काळजी वाटल्याने  हरविल्या बाबत पोलीस स्टेशनला  खबर देण्यासाठी बस स्थानक चौकात आले होते त्यांना ओळखीच्या व्यक्ती कडून तुमचा मुलगा रिक्षात बसुन  कामावर जात असल्याचे सागीतल्याने ते घरी परत आले वर  थोड्यावेळाने मयत विजय चा चुलत भाऊ बळीराम माळी यांच्या मोबाईलवर त्यांच्या मित्राने संपर्क साधुन तुझा भाऊ आठवडे बाजारा जवळील पुला जवळ मृत अवस्थेत असल्याची खबर मिळताच नातेवायीकाणी घटना स्थळी जाऊन खातरजाम करण्यासाठी गेले असता त्या मृतदेहाच्या शरिरावरील खुणा , उजव्या हातावर विजय नाव असे गोधलेले असल्याने त्याची खात्री झाल्याने मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात नेले

मयत विजय घरात एकुलता एक मुलगा होता

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बळीराम विश्वानाथ माळी याच्या खबरीवरूण अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मजहर पाठण, नागेंद्र तायडे हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.