एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख आज जाहीर होणार

0

मुंबई :  एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं. मात्र हे सांगत असताना शासकिय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आता परीक्षेची कोणती तारीख घोषित होतीय?, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत.

MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या 8 दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आठ दिवसात परीक्षा कशी होणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?

येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीपद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले.

Leave A Reply

Your email address will not be published.