महेलखेडीच्या शिक्षकाचा शिंदी गावाजवळ संशास्पद मृत्यू

0

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील महेलखेडी येथील रहीवाशी आणी न . ह . राका हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज बोदवड मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले रुबाब ईब्राहीम तडवी वय५२वर्ष ह.मु. फालक नगर भुसावळ हे शिंदी तालुका भुसावळ या गावाजवळ अत्यंत गंभीर अवस्थेत रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या कडील मोटरसायकलसह आढळुन आले.

त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसुन आले असुन, तडवी यांचा झालेला मृत्यु हा संशयास्पद असल्याचे आरोप त्यांच्या नातेवाईकांकडुन करण्यात येत आहे. दिनांक १oमार्च रोजी झालेल्या शिंदी गावाजवळ घड लेल्या माहीतीनुसार घटनेची माहीती मिळताच शिंदी गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जख्मी अवस्थेत असलेले रूबाब तडवी यांना रूग्णवाहीकेव्दारे डॉ . उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी रवाना केले .डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला . मयत तडवी यांनी मंगळवारी हायस्कुलमधुन सुटी घेतली होती. रूबाब तडवी मुळ् महेलखेडी ता . यावल येथील रहिवाशी असुन मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी , दोन मुल असे कुटुंब असुन , काल महेलखेळी गावात त्यांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेबाबतची नोंद भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.