भुसावळ येथील जे.के ट्रेडस्चे सामाजिक दायित्व ; परप्रांतीयांना मदतीचा हात

0

भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
देशात सर्वत्र लाँकडाऊन लागु करण्यात आले आहे यामुळे सर्व कामधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरासाठी मोठी बिकट परीस्थिती निर्माण झाली आहे. आता चौथ्या लाँकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली आहे. तरी देखील परप्रांतीय मजुरांनी मात्र आपल्या गावी जाण्याकरीता मिळेल त्या वाहनाने तर कधी मजल दरमजल करीत आपआपल्या गावाची वाट धरली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनातून जातांना दिसुन येत आहे. तर काही परप्रांतीय मजूर हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे . मात्र अशा मजल दरमजल पायी प्रवास करणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीला जिल्ह्यातील नामवंत तथा भुसावळ शहरातील जे के ट्रेडर्स यांनी सामाजिक दायित्व स्विकारुन लॉक डाऊन काळात मदत केली जात आहे.

जे के ट्रेडर्सचे संचालक यांनी लॉक डाउन झाल्यापासून परप्रांतीय मजुरांसाठी चहा, पाणी, नाष्टा ,यासह जेवणाची व्यवस्था केली आहे, तसेच 44 अंश सेल्शियस तापमानात सुद्धा अनवाणी पायी चालणाऱ्या परप्रांतीयांसाठी चपलांची देखील सोय करून दिली आहे .ज्या मजूरा कडे त्यांच्या गावी जाण्यासाठी पैसे नाहीत अशांना देखील त्यांनी स्वखर्चानेत्यांचे गावी आतापर्यंत रवाना केले आहे. भुसावळ शहरात कालपासून कलकत्ता येथील १५ ते १७ लोक जे .के ट्रेडर्स यांच्याकडे मुक्कामी आहेत . त्यांनी त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली असून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचे काम देखील ते करीत आहे.

दरम्यान, शासनातर्फे नुकताच आदेश आला आहे की, फक्त शेजारील राज्यांतील मजुरां करिताच बस चालवण्यात येतील आणि राज्या पलीकडील मजुरां करिता सोय करता येणार नाही. बंगालमधील सरकारने मजुरांना येण्याकरिता परवानगी दिली नसल्याने बंगाल करिता जाण्यासाठी रेल्वे सुद्धा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. बंगाल मधील सरकार मजुरांना घेण्यास असमर्थ असेल तर मजुरांनी बंगालमध्ये जाण्याची घाई न करता महाराष्ट्रातच आहे त्या ठिकाणी थांबून काम धंदे करावे असे जे .के .संचालकांनी म्हटले आहे कलकत्त्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आमदार व तहसीलदार यांच्याशी बोलणे झाले असून जर त्यांच्या जाण्याची व्यवस्था होत असेल तर आम्ही स्वखर्चाने भाडे भरून यांना रवाना करणार असल्याचे जे के ट्रेडर्सचे संचालक यांनी सांगितले आहे. काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील दोन कॉलेज शिकणाऱ्या मुली पायी येत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यांना स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले आहे.

टिबर मार्केट प्लॉट होल्डर असोसिएशन कार्य करणारे कमलजीत सिंह गुजराल , अजित सिंह बेहरा,संजय काळे,सतिश उगले,पिंटु बोधराज,रवि वर्मा, विकास पाचपांडे,रवि ढगे,सचिन अग्रवाल,जगदीश पटेल, पंकज पाटील आदीचा सहभाग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.