धक्कादायक : टाकरखेडा येथे विहीरीत पडून मातेसह दोन मुलांचा मृत्यू

0

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरखेडा येथे विहीरीत पडुन मातेसह दोन मुलांचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.२१ रोजी दुपारी ११.30 ते १२.00 वाजेच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार टाकरखेडा येथील विवाहीता भारती सचिन पाटील (वय ३२)तसेच गजानन (वय१२) व स्वामी(वय७) या तिघांचा टाकरखेडा शिवारात असलेल्या स्वतःच्या शेतात सुमारे ७० फुट खोल विहीरीत बुडुन मृत्यु झाला या विहीरीत सुमारे ३५ फुटापर्यंत पाणी होते.
तिघांच्या मृत्युचे कारण अद्याप समजु शकले नाही मयताचा पती सचिन देखील बाजुच्या शेतात काम करीत होता त्याला विहीरीत काही तरी पडल्याचा आवाज ऐकू आल्याने तो धावतच विहीरी जवळ येऊन वाचवा वाचवा आवाज देऊन त्याने ग्रामस्थांना गोळा केले.

तोपर्यंत वेळ निघुन गेली होती सदर विवाहीतेला दोन्ही मुलेच असल्याने सचिनच्या पत्नीसह वंशाचे दिवे विझल्याने त्याची दातखिळीच बसली.भारती माहेर भालेर (ता.जि.नंदुरबार) येथील असुन पती सचिनचा मुळ व्यवसाय शेती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.