ऑर्डनन्स फॅक्ट-यांचे कार्पोरेशन जाहीर केल्याबद्दल सरकारचा निषेध ; संघटना आंदोलन करणार

0

वरणगाव (प्रतिनिधी) : देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीचे निगमीकरण करीत असल्याचे घोषित केले असून तसेच आर्डनन्स फॅक्टरीमध्ये एफडीआय ४९% वरून ७४ % करण्यात आले आहे. या कारणाने ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणा जाण्याचे चिन्हे दिसत असून याचा निषेध ऑर्डनन्स फॅक्टरी मधील कामगार युनियन इंटक व भारतीय मजदूर संघ यांनी केला आहे. यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहीती वरणगांव फॅक्टरीतील ज्युनियर क्लब मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी कामगार युनियनचे सुनिल महाजन , विशाल भाल शंकर , इंटक युनियनचे महेश पाटील , रवि देशमुख , भारतीय मजदूर संघाचे भानुदास सपकाळे , सचिन चौधरी आदी उपस्थीत होते.

यावेळीकामगार युनियन चे सुनील महाजन यांनी सांगितले की सरकारच्या या नितीचा कडाडून विरोध करण्यात येणार असून यासाठी परिवारा सहित रस्त्यावर उतरू असे , कोरोना च्या लाकडाउनचा फायदा घेवुन . हा निर्णय घेणे म्हणजे कामगारांच्या पाठीत खंजीर मारण्यासारखे आहे , इंटकचे महेश पाटील यांनी सांगितले कारपोरेशन व एफ डी आय चा मुद्दा मागे घ्यावा यासाठी संप व इतर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असुन कोरोना सारख्या संकटकाळात फॅक्टरी कर्मचाऱ्यांनी च सॅनिटायझर, मास्क , पी पी ई किट , कॉट ची निर्मिती केली , जबाबदारी म्हणून दोन दिवसाचा पगार पी.एम फंडात जमा केला, सरकारने घेतांना संघटनांना विचारात घेणे आवश्यक होते. भा. म संघाचे सचिन चौधरी म्हणाले की देशाच्या रक्षा मंत्रालयाच्या चौथ्या आधार स्तंभाचे खच्चीकरण खपवुन घेतले जाणार नाही.

देशातील ४१ आर्डनन्स फॅक्टरीत जीवाची पर्वा न करता कार्य सुरू असतांना आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण करून निगमीकरण धोरण जाहीर करणे यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. मागील संपाच्या वेळी निगमीकरण करणार नाही असे आश्वासन दिल्यावर हा निर्णय घेणे चुकीचे आहे. याचा निषेध विरोध करण्यासाठी काळ्या फित लावुन काम करणे, निवेदन देणे व लाकडाउन संपल्यानंतर तीव्र आंदोलन करून सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार आहे. भानुदास सपकाळे, रवि देशमुख यांनी सरकार रक्षा उद्योग उदयोग पतीच्या ताब्यात देत असुन नविन श्रम कायदा आणून अन्याय करीत असल्याचे सांगितले..

Leave A Reply

Your email address will not be published.