भुसावळ पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर विजयी

0
भुसावळ : येथील प्रभाग क्रमांक २४(अ) मधील पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर विजयी झाले आहे . त्यांना २२९१  मते मिळाली आहे .तर भाजपाचे उमेदवार रेखा सोनवणे यांना १४२९ मते मिळाली आहे .शिवसेनेचे उमेदवार विकी चव्हाण यास अवघे ९० मते मिळाली आहे. त्यामुळे दुर्गेश ठाकूर यांचा ८६२ मतांनी विजयी.
शहराचा विकास करण्याची  ताकद केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच – माजी आ. संतोष चौधरीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जनाधार पार्टीचे विलीणीकरण शहराचा विकास करण्याची  ताकद केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे ती दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाही,आज दुर्गेश ठाकुर यांना जनतेने दिलेला कौल यावरून सत्याचा विजय झाला आहे .आणि म्हणूनच   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातजनाधार पार्टीचे विलीणीकरण करत असल्याची घोषणा माजी
आमदार संतोष चौधरी यांनी शुक्रवार 10 रोजी येथे केली.     नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४-अ साठी झालेल्यापोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दुर्गेश ठाकूर यांचा विजय झाला . यावेळी माजी आमदार संतोष चौधरी पत्रकारांशी बोलत होते. सर्वसामान्य मतदार आणि नागरीकांमध्ये विरोधी पक्षाबाबत रोष होता. आज दुर्गेश ठाकूर यांना निवडून आणून रोष व्यक्त केला. प्रभाग 24 अ मधील कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घेतल्यामुळे पोटनिवडणुकीत
राष्ट्रवादीने बाजी मारली असल्याचे देखील चौधरी यांनीसांगितले. यावेळी युवा नेते सचिन चौधरी, माजी प्रभारीनगराध्यक्ष अनिल चौधरी, सचिन चौधरी, सतिष घुले , उल्हास पगारे , बुटासिंग चितोडीया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.