भुसावळ तालुका गो-गर्ल- गो स्पर्धा उत्साहात संपन्न

0

भुसावळ (प्रतिनिधी )- 

क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  जळगाव यांच्या पत्रान्वये राज्‍यातील मुलींच्‍या तंदुरुस्ती बाबत जागरूकता निर्माण करणे व बेटीबचाव बेटी पढाव , बेटी खिलाओ या उक्तीस अनुसरून मुलींना अधिकाधिक सुविधा देवुन क्रीडा क्षेत्रात त्यांचे प्राविण्य आणि वैयक्तिक स्वाथ्यास महत्व देणे करीता महाराष्ट्रातील ६ते१८वयोगटातील मुलींसाठी गो-गर्ल-गो शालेय ते राज्य स्तरावर १००मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत भुसावळ तालुका स्तरीय स्पर्धा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन संगिता बियाणी यांनी केले. अध्यक्ष स्थानी प्र.गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान  हे होते.प्रमुख पाहुणे प्राचार्य डी.एम.पाटील. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शा.शि.शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे,तालुका समन्वयक बी.एन. पाटील,प्राथमिक संघटना समन्वयक प्रदीप सोनवणे सर्व शिक्षक, शिक्षिका , खेळाडू उपस्थित होते.    या१००मी. धावण्याच्या स्पर्धा  ६ ते९ ,१० ते१३ , १४ ते १८ या तिन गटात घेण्यात आल्या.यात तालुक्यातील ६४शाळांचे १८७खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

यात विजयी स्पर्धक-६ते९ वयोगटात  प्रथम मोनु ठाकूर  -जि. प.शाळा वांजोळा,द्वितीय – निशा साळुंके  जि.प.शाळा सुनसगांव ,तृतिय क्रमांक – चैताली पावरी जि. प. शाळा,सिध्देश्वर नगर,१० ते १३ वयोगटात प्रथम प्रिती गोळे बियाणी मिलिटरी स्कुल भुसावळ ,व्‍दितीय अश्विनी पावरा -बियाणी पब्लिक स्कुल भुसावळ, तृतिय वर्षा भारंबे पंडीत नेहरू विद्यालय.१४ ते१८ वयोगटात प्रथम क्रीशा बुला ताप्ती पब्लीक स्कुल,व्‍दितीय रियाना तडवी बियाणी प.स्कुल, तृतिय सिमरन सुरवाडे श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी यांचा समावेश आहे.  सदर कार्यक्रम प्रसंगी संगिता बियाणी यांची राष्ट्रीय बालव किशोर विकास समितीच्या सहप्रभारी पदी निवड झाल्या बद्दल पं.स. शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान व महराष्ट्र राज्य क्रीडा व शा.शि.शिक्षक महासंघ,उर्दु शिक्षक, जि.प. शिक्षक संघटना यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. पंच म्हणून विलास पाटील,ईश्वर खंडेलवाल,वाणी सर,बोरोले सर,गोपाळ जोनवाल,  बोरसे सर,राणे आदींनी काम पाहीले. सुत्रसंचलन अमित चौधरी तर आभार एम. के वाणी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.