भुसावळ उपविभागात ऑल आऊट ऑपरेशन मोहिमेत गुन्हेगारांवर कारवाई

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव  शांततेमध्ये साजरा व्हावा, त्या काळामध्ये समाजकंटकांवर वचक राहावा, या दृष्टीने काल रात्री अर्थात दि 7 सप्टेंबर चे रात्री 10 ते 8 सप्टेंबर चे पहाटे 3 पर्यंत भुसावळ शहरामध्ये पोलीस विभागाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. भुसावळ उपविभागात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम दरम्यान बाजारपेठ व भुसावळ शहर पोलीस स्टेशनला पुढील प्रमाणे कारवाई  करण्यात आली .

या कारवाईत सर्व  18  तडीपार इसम चेक केले. त्यापैकी हेमंत पैठणकर मिळून आला, त्याचे विरोधात कलम 142,122 म पो अधिनियम, 4/25 आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करत गुन्हा दाखल करून  एक तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपी शाहिद  शे पिंजारी रा गरीब नवाज याचे घरझडती मध्ये  2 तलवारी मिळून आल्या, त्याबाबत 4/25 आर्म ऍक्ट कारवाई करण्यात आली. आरोपी राहुल नेहते रा. पाटील मळा मिळून आला. त्यास  अप न 78/20 भा द वि कलम 376 ,363 सह पोस्को मध्ये  अटक करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन आरोपीवर  गुन्हा रजिस्टर क्रमांक 70 /20 कलम 307 मध्ये अटक केली. 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत 1 कारवाई तर दारूबंदी कायद्याप्रमाणे  4 केसेस, 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणपती उत्सव निमित्ताने  कलम सीआरपीसी 144(3)  प्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी काढलेले तालुका बंदीचे 20 आदेश  बजावणी केली. त्यानुसार आदेशात नमूद केलेल्या व्यक्तींना भुसावळ शहर व भुसावळ तालुका महसूल सीमेच्या हद्दीमध्ये दिनांक 9 सप्टेंबर ते दिनांक 20 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

शहरात रात्री नाकाबंदी लावून उशिरा फिरणारी 61  वाहने चेक केली.एक संशयित वाहन मिलून आले.त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 प्रमाणे कारवाई केरून गुन्हा नोंद केला. पुढील तपास करत आहोत. 34 हिस्ट्री सीटर चेक केले. त्यापैकी मिळाले 21 त्यांना चांगल्या वर्तनची समज दिली. अभिलेखा वरील अवैध शस्त्र बाळगणारे  12 गुन्हेगार चेक केले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव  चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ सोमनाथ वाघचौरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे, भुसावळ शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक शेंडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक दूनगहू, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, त्याचप्रमाणे भुसावळ शहर व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या गुन्हे शोध पथकच्या अंमलदारांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.