भुसावळात संचारबंदी दरम्यान विनाकारण नियम तोडणार्‍यांना पोलिसांनी दिला चोप

0

भुसावळ | प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्याकरीता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमिवर आज २४ रोजी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट आढळून आला. बाजारपेठेत मात्रक सकाळी लोकांनी एकच गर्दी केल्याने सब्जी मंडीतील भाजीपाला विक्रेत्यांना पोलिसांनी घरी पाठविले. यानंतर शहरात पोलिसांनी गस्त सुरू झाली. यात विनाकारण रस्त्यावर दुचाकीवर फिरणारे व पायी फिरतांना काही तरुण व इसम आढळून आल्यांने त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तर अनेकांना ऊठक-बैठक काढून व हात जोडून माफी मागायला लावली.
हिंदु धर्मातील पाडवा सणावर कोरोनाचे सावट ;
दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कलम 144 लागू केला आहे. सर्वदूर संचारबंदी लागू झाल्याने सगळेच खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुख्यत्वे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा सण २५ मार्च रोजी आहे मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साधली जाणारी सारीच कामे आता पुढे ढकलली गेली आहेत.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
भुसावळात सामान्यांसाठी पेट्रोलपंप बंद; फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच डिझेल पेट्रोल पुरवठा होणार ;
महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने सुद्धा गर्दी होतच आहे. त्यामुळे आता शेवटी पेट्रोल पंपावर निर्बंध घालण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डीझेल उपलब्ध असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.