भुसावळात भाजपेयींचे संघप्रेम घटले?

0

भुसावळ, दि.21 –
भुसावळ शहराचे राजकारण हे धक्के देणारे राजकारण आहे. यातुन शहरातील धुरंधर राजकारणी सुध्दा सुटू शकले नाहीत. शहरात भा.ज.पा.ची चलती आहे. नगर पालिका भाजपाच्या ताब्यात आहे . परंतु राष्ट्ीय स्वयंसेवक संघा विषयी भुसावळ भाजपेयींचे प्रेम दिसेंदिवस घटत असल्याचे विजयादशामिच्या पथसंचलनाच्यावेळी दिसून आले.
रा.स्व.संघाचे सरसंघचालक यांनी दसर्याच्या दिवशी त्यांच्या अभिभाषणात संघाचा कोणत्याही राजकियपक्षाशी संबध नाही असे जाहिर केले. परंतु भा.ज.पा. आणि संघ हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समिकरण आहेच हे जगात कोणीही नकारु शकत नाही. भुसावळ तालुका सध्यातरी भाजपमय आहे. आ.संजय सावकारे हे भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे सुध्दा भाजपाचेच आहेत. नगर परिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे.
सुमारे 1 वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकिच्या अगोदर विजयदशमीच्या दिवशी भुसावळ शहरात संघाचे पथसंचलन निघाले असता त्यात विद्यमान नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपाचे तत्कालीन नगरसेवक , पदाधिकारी व भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास ईच्छूक असलेले बहुसंख्येने सहभागी झाले होते. नगरपरिषदेची निवडणूक आटोपल्या नंतर पथसंचलनामध्ये सहभाग घेणार्या भाजपेयींची संख्या घटली.तरी गेल्या वर्षी भाजपाचे काही पदाधिकारी सहभागी झाले तर काहींनी स्वागत कमानी लावून आपला सहभाग नोंदवीला होता. यावर्षीच्या पथसंचलनामध्ये भा.ज.पा.च्या स्थानिक आघाड्यांचे पदाधिकारी दिसून आले नाहीत.तसेच शहरात स्वागत कमानसुध्दा झळकल्या नाहीत.
संघाच्या धोरणानुसार कोणी सोबत असो व नसो स्वयंसेवक आपले कर्तव्य बजावत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.