गावठी कट्ट्यासह तरूणाच्या मुसक्या आवळल्या

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : संशयितावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल

भुसावळ-

येथील नाहाटा महाविद्यालयाजवळ रेकॉर्ड वरील गुन्हेगार अभिषेक राजेश शर्मा (वय 20, रा.चमेली नगर भुसावळ) हा आपल्याजवळ गावठी कट्टा घेवून फिरत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे 15 हजारांच्या गावठी कट्ट्यासह अटक करण्याची कारवाई दि.14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या समारास घडली. संशयीताविरुद्ध यापूर्वी शरीरावरील ईजा करणे तसेच डीजे साहित्य चोरीचा गुन्हा दाखल आहे.
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार अभिषेक राजेश शर्मा (वय 20, रा.चमेली नगर भुसावळ) हा स्वत: जवळ गावठी बनावटीचा विना परवाना कट्टा बागळुन त्या परीसरात कोणत्या तरी उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती.
पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, पो.नि. देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोस्टे डीबी पथकातील पोउनि निशीकांत जोशी, पो.हे.काँ सुनिल जोशी, पो.काँ विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, अक्षय चव्हाण यांनी सापडा रचून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या 15 हजार रुपयांचा एक बनावटी कट्टा मिळुन आला. याबाबत बाजारपेठ पोलिसात अभिषेक शर्मा विरुद्ध आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हे.काँ सुनिल जोशी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.