भुसावळात चाकूचा धाक दाखवून तिघांनी एकास लुटले

0

भुसावळ ;- रिक्षाची मजुरी देण्यासाठी निघालेल्या इसमाच्या गळ्याला चाकू लावून त्याच्या खिशातील सुमारे ५ हजार रुपयांची रोकडलांबविल्याची घटना २१ शनिवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,  शहरातील दीनदयाल नगर ,फकीर गल्ली मस्जिदच्या मागे अनिल हनुमानसिंग ठाकूर हे २१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास  रिक्षाचे सीट कव्हरची ४ हजार ९०० रुपये   मजुरी देण्यासाठी फकीर गल्ली गिरीश किराणा समोर मोटरसायकल लावून जात असतांना आरोपी अशोक कोळी उर्फे भाचा पूर्ण नाव माहीत नाही,जावेद उर्फ पोटली पूर्ण नाव माहीत नाही. यातील एका आरोपीने हाताने तोंड दाबून दुसऱ्या हाताने गळ्यावर चाकूूसारखे हत्यार लावून आरोपी जावेद उर्फ पोटली याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून ४ हजार ९०० रुपये जबरदस्तीने हिसकावून  खाली पडले .दोघांन्सोब्तन आणखी एक अनोळखी  असे तिघे जण   पसार झाले . याबाबत अनिल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून   बाजारपेठ पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि  कृष्णा भोये करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.