होमगार्डला कानशिलात मारून पोलिसाची कॉलर पकडणाऱ्याविरुद्ध गुन्हा

0

अमळनेर : शहरातील सुभाष चौक ते पाच कंदील चौकात वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या होम गार्डला कानशिलात मारून पोलिसाची कॉलर पकडून हुज्जतबाजी घालणाऱ्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना २१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,

२१ रोजी सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना कर्तव्यावर असणारे होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत असताना पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे यांना  तू पोलिसांचा ड्रेस का घातला असा प्रश्न करून  तुझे ओळखपत्र दाखव असे सांगत  निलेश यांच्या कानशिलात लगावली . हा प्रकार कळताच तेथे धावून आलेल्या वाहतूक पोलीस ललित पाटील व इतरांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता  इस्माईल खड्डा याने ललित पाटील यांची कॉलर पकडली .  त्यामुळे होमगार्ड निलेश मराठे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक पाडवी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.