भुसावळात गावठी पिस्तूलसह एकास अटक

0

भुसावळ –  शहरातील यावल नाक्याजवळील रोडवर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले . याबाबत भुसावळ शहर पोलीसात आरोपी विरुद्ध आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जितेंद्र किसन पाटील वय-49 रा. समर्थ नगर, घोडेपीर बाबा हा शहरातील यावल नाक्याजवळील रोडवर रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीर 5 हजार रूपये किंमतीचा देशी बनावटीचा पिस्तूल घेऊन फिरत असल्याची असल्याची गुप्त माहिती भुसावळ शहर पोलीसांना  मिळाली. त्यानुसार पोउनि नाना सुर्यवंशी यांनी व सहका-यांनी यावल नाका येथे तपासणी केली असता असता आरोपी जितेंद्र पाटील याच्या कमरेला पिस्तूल मिळून आले  .पोलीसांनी गावठी पिस्तूल हस्तगत करून जितेंद्र पाटील याला ताब्यात घेतले आहे. पो.कॉ. जितेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीसात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहम्मद अली सय्यद हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.