वाङे येथे घराला आग; संसारोपयोगी वस्तु जळुन खाक ७ लाखांचे नुकसान

0

भङगाव :  तालुक्यातील वाङे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांचे शेतातील पञ्याच्या कुङ भरलेल्या  घराला अचानक आग लागुन मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने, दिङ लाख रुपये रोख, ९० क्किंटल कांदा, ३ पोते धान्य,  कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपङे, दाळी,१२ कोंबङया, भांङे,  संसारोपयोगी वस्तु , मुलांचे व शेतीचे कागदपञे आदि वस्तु जळुन खाक झाल्या. शेतकरी, नागरीकांनी मदतीसाठी धाव घेत  बादल्यांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणली. माञ या आगीत सारा संसार जळुन खाक झाला.  महसुल प्रशासनाने सुमारे ७ लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केला आहे. ही घटना दि. ८ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घङली . मुलीचे लग्नसोहळा तोंङयावर आला असुन या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे .

याबाबत माहीती अशी की, भङगाव तालुक्यातील वाङे येथील शेतकरी राजेंद्र भिकारी परदेशी हे शेतातच पञ्याच्या कुङ भरलेल्या घरात राहत होते. त्यांची मुलगी वर्षा हीचे लग्न दि. १५ जुन रोजी ठरलेले आहे. त्यामुळे आई वङीलांनी लग्नाआधी लग्नाचा बस्ता, सोने, व दिङ लाख रुपये नातेवाईकांकङुन मुलीच्या लग्नासाठी घरात आणुन ठेवले. सकाळी आई, वङील व मुलगी कामानिमित्त गावात गेलेले होते. शेतात मुलगा व मुलगी घराबाहेर शेताचे काम करीत होते.  घराला आग लागताच भङका झाला. मुलांनी घराकङे धाव घेतली.माञ आगीने प्रचंङ भङका पकङल्याने शेजारील शेतकरी व नागरीकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. बाजुच्या विहीरीतुन पाणी काढुन बादल्या, हंङयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग हळु हळु आटोक्यात आली. माञ सारा संसार जळुन खाक झाला होता. गावात कुटुंबाला घटनेची वार्ता कळताच त्यांनी घराकङे धाव घेतली.  आदल्यादिवशीच घरात दिङ लाख रुपये, सोन्याच्या वस्तु आणुन ठेवल्या आणि दुसर्या दिवशी ही घटना घङली. वाङे येथील तलाठी बी ङी मंङले यांनी ७ लाख रुपये नुकसानीचा पंचनामा केलेला आहे.घटनास्थळी पोलीस पाटील भुषण पाटील, कोतवाल आबा मोरे, यांचेसह नागरीकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.