गिरीश महाजनांवर अश्लील कमेंट; चाैघांची चाैकशी

0

जळगाव :- ‘पालकमंत्र्यांच्या संपर्कात राज्यातील काही आमदार’ या फेसबुक पोस्टवर काही तरुणांनी अश्लील मेसेज टाकला हाेता. या पाेस्टमुळे खळबळ उडाल्याने त्याबाबत तक्रार करण्यात अाली हाेती. पालकमंत्र्यांविषयी अक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याने एलसीबीने चौकशीसाठी यातील चार तरुणांना ताब्यात घेतले.

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात राज्यातील काही आमदार असल्याची पोस्ट फेसबुक या सोशल साइटवर व्हायरल झाली होती. सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल हे काहीच सांगता येत नाही. पालकमंत्र्यांच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार या फेसबुकवरील पोस्टला अनेकांनी लाइक केले; तर काहींनी मेसेज टाकून या वृत्ताबाबत सकारात्मकता दर्शवत कॉमेंट केले होते. मात्र, याच पोस्टवर काही तरुणांनी अश्लील कॉमेंट टाकल्याने खळबळ उडाली होती. तसेच या अश्लील कमेंटविरुद्ध तक्रारही करण्यात अाली हाेती. अश्लील कॉमेंट टाकल्याप्रकरणाी यातील चार तरुणांना एलसीबीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चारही तरुणांना एलसीबीच्या पथकाने मनमाड अाणि भुसावळ येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले, असे पाेलिसांकडून सांगण्यात अाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.