भुसावळात एकावर चाकू हल्ला ; एक गंभीर जखमी

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  नारळ विक्रेत्याला फुकट नारळ  मागितले असता  नकार दिल्याचा राग आल्याच्या कारणावरून शहरातील श्रीराम नगर भागात नारळ विक्रेत्यावर पाच जणांनी चाक़ूने हल्ला केल्याने यात एकजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली .याप्रकरणी स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,श्रीराम नगर भागातील बंटी तायडे   यास आरोपी रवी ढगे,संजय ढगे,भावेश ढगे,पिंटू काळे,सुश्रुत झोपे यांनी विकत असलेले नारळ फुकट मागितले असता फिर्यादीने नकार दिला याचा  राग आल्याच्या कारणावरून त्यांनी बंटी वर  चाकू,चॉपर,लोंखडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी तुषार अनिल जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भादवी कलम  ३२६,३२३,१४३,१४७,१४८ ,१४९, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमींवर उपचार गोदावरी हॉस्पिटल मध्ये सुरू आहे.

दरम्यान याच भांडणात  फिर्यादी संजय जगन्नाथ ढगे वय ४० राहणार श्रीराम नगर ,कोंडेवाडी भाग भुसावळ यांनी फिर्याद दिली की  आरोपी बंटी तायडे (जखमी) पूर्ण नाव माहीत नाही रहिवासी श्रीराम नगर,बोंडे कटर मशीन जवळील असून याने काही एक कारण नसतांना भांडण करून मारामारी केली या फिर्यादिवरुन आरोपी बंटी तायडे यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ५९८/२०२० कलम ३२४ प्रमाणे  बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली परस्परांविरुद्ध गुन्हे  दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.