जळगाव जिल्ह्यात आणखी ७ पॉझिटिव्ह आढळले ; रुग्ण संख्या १०२० वर

0

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. आज सायंकाळी 56 कोरोना संशयित व्यक्तींचे स्वब अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर ७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  यात जामनेर 2 , चाळीसगाव 2 , धरणगाव 2, आणि भालोद तालुका यावल 1, असे एकूण सात रुग्ण आढळून आले आहे.

आज दिवसभरात एकुण ६३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १०२० इतकी झाली आहे.  तर ११७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ४७८ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.