जिल्हाधिकाऱ्यांची पारोळा कोव्हिड सेंटरला भेट

0

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा येथील कोव्हीङ सेंटरला आज सांयकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भेट देउन पाहणी केली. आज कोरोनामुक्त झालेले, एकुण १२  कोरोनामुक्त नागरीकांसह महीलांना घरी सोडण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  कोरोनामुक्त  नागरीकांशी संवाद साधत विचारपुस केली व पुढील काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला दिला, तसेच  येथे सेवा कशी मिळाली याचीही माहीती रुग्णांना विचारली. चांगली सेवा मिळाली असुन नागरीकांनी या कोव्हीड सेंटर मधुन आज घरी सोडण्यात आलेल्या नागरीकांनी येथील डॉक्टर स्टॅाप सह डॉ, योगेश सांळुखे यांचे विशेष कौतुक केले, तर प्रशासनाचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना पारोळा बाजारपेठे विषयी विचारले असता सांगितले की राज्याची नवीन नियमावली आल्यावर विचार करण्यात येईल सध्या नियमानुसार प्रतिबंधीत क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सुट नाही,यानंतर जिल्हा अधिकारी अविनाश ढाकणे यांनी डाॅक्टर व स्थानिक प्रशासन यांचेशी चर्चा केली. काही सुचना ही केल्या. तसेच कामकाजा बाबत समाधानही व्यक्त केले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ.. पंजाबराव उगले, एरंडोल उप विभागीय अधिकारी विनय गोसावी, पारोळा तहसिलदार अनिल गंवादे,पारोळा पोलीस उपनिरीक्षक बागुल, पारोळा मुख्याधिकारी डॉ,विजय कुमार मुंडे, शहर तलाठी निशिकांत पाटील,  वैधकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, पारोळा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ,योगेश सांळुखे, डॉ, गिरीश जोशी, डॉ, पारोचे, तसेच इतर स्टाप, उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.