भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी )विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयु.प्रताप पाटील यांची निवड करण्यात आली. दि १४ रोजी जितेंद्र वानखेडे तालुका प्रमुख भीम आर्मी सामाजिक संगटना पारोळा यांच्या अध्यक्षतेखाली भीम जयंती महोत्सव नियोजन बैठक घेण्यात आली.

यावेळी भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील तर उपाध्यक्षपदी-जितेंद्र वानखेडे, विनोद मणसाराम पाटील -सचिव, शामभाऊ जाधव- कार्याध्यक्ष , भाऊसाहेब सोनवणे- खजिनदार, मनोहर केदार- उपसचिव, कमलेश सोनवणे- उपकार्याध्यक्ष, सचिन खेडकर-  सहखजिनदार तर सल्लागार म्हणून हर्षल सूर्यवंशी सर , मनोहर संदनशिव, विरेंद्र सरदार, ऍड स्वाती शिंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सागर सरदार, अरविंद जाधव, शैलेश पाटील, फईम खान पठाण  गौतम मगरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.