भारतीय रेल्वेत 3,591 पदांसाठी जम्बो भरती, परीक्षा न देता थेट नोकरीची संधी

0

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेअंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 3378 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरुवात 1 जूनपासून होणार आहे.

पात्रता –

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. त्यासोबतच त्याच्याकडे NCVTशी संबंधित ITI सर्टिफिकेट पाहिजे.

वयोमर्यादा –

उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 दरम्यान असणे आवश्यक आहे.

अर्जाचे शुल्क

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

महत्वाची तारीख –

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 जून 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपेल.

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या दक्षिण विभागाच्या वेबसाईट www.sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.