भातखंडेचे एसआरपीएफ जवान समाधान पाटील यांचे वृक्ष व पर्यावरण संवर्धनाचे कार्याने केले सन्मानित

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सीआरपीएफ जवान सध्या नेमणूक (एस डी आर एफ)समाधान चंद्रकांत पाटील हल्ली धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलात सेवेत असताना एस आर पी एफ कॅम्प परिसराच्या क्षेत्रात अडीचशे ते तीनशे एकर विभागात स्वतः व कर्मचारी यांच्या सहकार्याने वृक्ष व पर्यावरण संवर्धनाचे काम सातत्याने करत असतो.

कर्तव्य बजावत हा एस आर पी एफ चा जवान छंद जोपासत आहे. तरी या कामासाठी त्यांना एस डी आर एफ चे सहा. समादेशक सदाशिव पाटील साहेब हे नेहमी मार्गदर्शन या सहकार्य करत असतात .समाधान पाटील यांनी कॅम्प परिसरात  क्वार्टरच्या सांडपाण्यावर पाचशे ते सहाशे झाडांना पाणी पुरवठा करत असतो तसे इतर हजारो वृक्षांना टँकर च्या साह्याने पाणीपुरवठा करत असतो तसेच टँकरच्या साह्याने हजार वृक्षांना पाणी पुरवठा करत असतो पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्यांना अन्न, पाणी तसेच निवारासाठी बॉक्स तयार करत असतात, मोकाट फिरणाऱ्या जनावरांसाठी ठिक ठिकाणी पाण्याचे ड्रम ठेवण्यात आली आहेत. कॅम्प परिसरात काचेच्या रिकाम्या बाटल्या असा कचरा की जो शंभर वर्ष ही सडत नाही. अ

शा ११० किलो वजनाच्या बाटल्या जमा करून त्याची विल्हेवाट लावली आहे. अशा या गुणग्राहक राज्य राखीव पोलीस दलातील भातखंडे येथील रहिवासी समाधान पाटील या जवानाची कामगिरी कौतुकास्पद आहे. याचा सार्थ अभिमान भातखंडे सह परिसरातील ग्रामस्थांना आहे. समाधान पाटील यांच्या कार्याबद्दल २०१८ मध्ये, सी .ओ. सचिन गोरे साहेब यांनी त्यांचा गौरव केला २०२० मध्ये, सी. ओ. संजय पाटील साहेब यांनी गौरव केला २०२१ मध्ये, सी. ओ. प्रल्हाद खाडे साहेब यांच्या कार्यकाळात पारितोषिक व सर्टिफिकेट देण्यात आले. तर ३१ मे २०२१ रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे साहेब यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्याच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव सन्मान करण्यात आला.

सीआरपीएफचे  जवान समाधान पाटील भातखंडे गावाच्या परिसरात देखील सांडपाण्याची विल्हेवाट लावून परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा संरक्षण करता येईल याबाबत ग्रामपंचायतीने व गावातील तरुणांनी सहकार्य केल्यास वृक्षलागवड व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येईल यासाठी मी स्वतः वेळात वेळ काढून मदत करण्यास केव्हाही तयार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.