भारतात कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ; पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

0

नवी दिल्ली : भारतात जीवघेण्या कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. दरम्यानं २४ तासात देशात कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.