भातखंडे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नोंदवला निषेध

0

भातखंडे( प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनास कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी पाठिंबा दिला असून काळी फीत लावून या शासन निर्णयाचा निषेध केला.
यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत एकत्र येऊन काळी फित लावून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक ११ डिसेंबर २०२० चा राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी पद रद्द कारण्याबत काढलेला शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक असून या शासन निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून प्रत्येक शाळेत शिपाई असणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केले.संस्था चालकांना शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सुनील पाटील, आय जे पाटील, एन यू देसले, बी एन पाटील, एस बी भोसले ,आर यू राऊळ, एस एन सोनवणे, एस जे सैंदाणे,ए एस पाटील, संदीप पाटील,लिपिक नित्यानंद पाटील,शिपाई, संजय पाटील ,सोपान पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.