भय्यू महाराज यांची आत्महत्या

0

इंदूर : –राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी इंदुर येथे गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कोण आहेत भय्यूजी महाराज?

भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख असं असून त्यांचे वय ४८ वर्षे इतके आहे. इंदूरमधल्या बापट चौकातील चौकामध्ये त्यांचा प्रसिद्ध आश्रम आहे. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे निधन झाले आहे. कुहू असं त्यांच्या मुलीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी भय्यूजी यांनी दुसरे लग्न केले होते.

भय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू असून त्यांची राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चांगली ओळख होती. चित्रपटक्षेत्र तसेच उद्योगक्षेत्रामध्ये देखील त्यांची बड्या मंडळींशी चांगली ओळख होती. या क्षेत्रातील अनेकजण त्यांचे भक्त होते, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडे येत असायचे.

काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं.

मॉडेल ते आध्यात्मिक गुरू

‘सियाराम’साठी केलेल्या मॉडेलिंगमुळे सर्वात आधी भय्यू महाराज चर्चेत आले. नंतर हळूहळू त्यांचा आध्यात्माकडे ओढा वाढत गेला आणि भय्यूजी महाराज अशी त्यांची ओळख बनली. शेतीबरोबरच तलवारबाजी आणि घोडेस्वारीचाही त्यांना छंद होता. ‘फेस रीडर’ म्हणूनही त्यांच्यावर राजकारण्यांचा विश्वास होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.