डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे भय्यूजी महाराजांना सामाजिक कार्याबद्दल मिळाली होती डि. लीट पदवी

0

इंदुर ;- डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे १३ एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रसंत भय्यूजी महाराज त्यांच्या सामजिक क्षेत्रातील योगदानाबद्दलडी. लिट पदवी प्रदान करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज इंदुर येथील श्री दत्त सद्गुरू धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे अध्यक्ष असून धर्म, नेतृत्व गुण, मानवता, समाज जागृती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विकास, व्यवस्थापन अशा विषयांवर मार्गदर्शन अनेक सामाजिक संस्थांची स्थापना, पारधी समाज आदिवासी धर्मशाळा, संविधानिक जागरण अभियान, तुरुंगवासीयांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण रथ, कृषितीर्थ योजना, समृद्ध गाव योजना यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांना डी. लिट पदवी देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.