भडगाव येथे मास्क न वापरणार्या 24 जणांवर दंडात्मक कार्यवाही

0

तहसिलदार, पोलिस, मुख्याधिकारी यांची रात्री गस्त सुरू

भडगाव- प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने भडगाव प्रशासनही अलर्ट झाले आहे. भडगाव तहसिल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपरीषद प्रशासन अशी संयुक्तीक कार्यवाही करत शहरात विना मास्क फिरणार्या एकुण १४ जणांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कार्यवाही केली. एकुण ७ हजार रुपये दंड दि.२३रोजी वसुल करण्यात आले. तसेच दि.24 रोजी 10 जणाविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. या वेळी पो.काँ. हरीश महाजन, जगन्नाथ महाजन, न. पा कर्मचारी – किशोर पाटील, आसीम मण्यार आदींनी कारवाई केली. अशी माहिती भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्सटेबल ईश्वर पाटील यांनी दिली. प्रशासनाने कार्यवाही सुरु केली त्यामुळे वाहनधारक, नागरीकांमध्ये शिस्त तसेच घबराहटीचे वातावरण पसरले आहे. कोरोना नियंञणात आणण्यासाठी प्रशासनाने यापुढेही अशीच कार्यवाही सुरु ठेवावी.नागरीकांनी विना मास्क फिरु नये. शासनाच्या नियमांचे पालन करावे.असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच भडगाव तालुक्यासह शहरात रात्री दहा वाजे नंतर संचारबंदी लागू केली आहे. या साठी तहसिलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, सुशील सोनवणे, पोलिस नाईक, लक्ष्मण पाटील हे रात्री गस्त घालत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.