करंजी येथुन ट्रक लांबविला

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथिल राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक सहा वरून दि,२ चे मध्यरात्री भर रस्त्या वरून ट्रक लाबविल्या ची घटना घडली.

याबाबत अधिक असे कि पारोळा तालुक्यातील करंजी शिवारातील हाॅटेल हिमाचल येथे दि,२ फेब्रुवारी च्या रोजी मोहम्मद शाहिद सलाम तुला किडवाई रा,देवपुर धुळे हे आपल्या मालकी चा ट्रक क्र,एम,एच,०४,ई,वाय,२७४३ घेऊन पारोळ्याकडुन धुळ्याकडे जात होतेे.

 

रात्री उशिर झाल्याने रात्री १ वा, आपला ट्रक हाटेल हिमाचल समोर लाऊन जेवणासाठी थांबले जेवण झाल्यावर थोडी विश्रांती घेण्यासाठी झोपले असता त्यांना गाढ झोप लागली सकाळी ७ च्या सुमारास जाग आल्या नंतर त्यांना लावलेल्या जागी आपला ट्रक आढळुन न आल्याने त्यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतु ट्रक कुठेच मिळुन न त्यानी दि,२३ फेब्रुवारी रोजी पारोळा पोलिस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरी चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.