भडगाव बसस्थानकात चिमुकल्यांचे रिंगण नृत्य

0

भडगाव :- आषाढी एकादशी निमित्त भङगाव येथील श्री साई समर्थ सी.बी.एस.सी इंटरनॅशनल स्कुल मार्फत चिमुकल्यांनी भक्तांचे वेष धारण करुन दिंङी काढण्यात आली. या आकर्षक सवादय दिंङीने सार्यांचे लक्ष वेधले.

भडगाव बसस्थानकातही या दिंङीच्या पालखीचे पुजन करुन भाविकांसह प्रवाशांनी दर्शन घेतले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ,पांङुरंग विठ्ठला,आदि भक्तीमय गितांनी वातावरण भक्तीमय झाले होते.सुरुवातीला शाळेत संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील , नगरसेविका सुवर्णा पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक आर के वंजारी , प्राचार्य संजय पुजारी, शिक्षक, शिक्ष्रिका, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने हजर होते. त्यानंतर शहरातुन वाजत गाजत चिमुकल्यांची पालखीसह दिंङी काढण्यात आली. बसस्थानकात चिमुकल्या विदयार्थ्यांनी गोल रिंगण करुन नृत्य सादर केले. यावेळी  पालखीचे पुजन वाहतुक नियंञक अरुण पाटील, वाहतुक नियंञक कल्याण पाटील, सहाय्यक कारागीर किशोर भोई, वाहतुक नियंञक राजु चौधरी,  अशोक परदेशी व प्रवाशांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नागरीकांसह, प्रवाशांची एकच गर्दी जमली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.