साजगाव येथे तरुणाची आजाराला कंटाळून आत्महत्या

0

पाचोरा :- तालुक्यातील साजगाव येथे तरुणाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. रविंद्र सुरेश भिल (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, रवींद्र भिल याने आजाराला कंटाळून घराच्या मागच्या बाजुस असलेल्या झाडाला दोर बांधून गळफास घेतला. मयत रविंद्र भिल याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. त्याचे पाशात्य आई, एक लहान भाऊ, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.  घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.