फिरोज पठाण यांचा स्विकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल

0

अमळनेर :- आमदार शिरीषदादा चौधरी मित्र आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवक पदासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते फिरोजखा पठाण यांचा अर्ज आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल करण्यात आला. नगरसेवक अ‍ॅड. सुरेश सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. मुस्लिम समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांचे नाव डॉ. रवींद्र चौधरी व आ. चौधरी यांनी निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी न.प. चे गटनेते प्रवीण पाठक, माजी उपमहापौर कलीम सालार, बाळासाहेब सदांनशिव, सलीम टोपी, संतोष लोहरे, पंकज चौधरी, श्याम पाटील, किरण बागुल, धनंजय महाजन, नरेंद्र चौधरी, महेश जाधव, सुरेश सोनवणे, गुलाम नबी, जकीर मेवती, मुशीर शेख व आमदार श्री. शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.