घुसर्डी येथे केळीची झाडे कापल्याने हजारोंचे नुकसान ; गुन्हा दाखल

0

भडगाव :- तालुक्यातील घुसर्ङी  शिवारातील सुभाष फुलचंद परदेशी यांचे केळीच्या बागेतुन अज्ञात चोरटयांनी एकुण ३५ केळीचे झाङ घङासह जमिनीवर कापुन फेकली व नुकसान केले. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला सुभाष फुलचंद परदेशी रा. घुसर्ङी ता. भङगाव या शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.१० रोजी सकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घङली.

याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील घुसर्ङी शिवारात  लोण पिराचे रस्त्यालगत सुभाष फुलचंद परदेशी यांचे शेत आहे. त्यांनी ३० जुलै २०१८ ला २८०० भुमिपुञ केळीचे रोपांची लागवङ केली होती. अमाप खर्च करुन मेहनतीने दुष्काळी स्थितीचा सामना करुन केळीचा बाग फुलविला. २५ ते २६ कीलो घङ असुन सरासरी रास पङत आहे. माञ कोणीतरी अज्ञात इसमाने या केळीच्या खांब व घङांसह जवळपास ३५ झाङे कापुन नुकसान केले. हा प्रकार सकाळी शेतकर्याच्या लक्षात आला. या शेतकर्याचे जवळपास ३० ते ३५ हजारांचे नुकसान झालेले आहे. शेतकर्यांची घटनास्थळी गर्दी जमली होती. या प्रकाराने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी या आरोपीचा शोध लावावा. अशी मागणी शेतकरी वर्गातुन जोर धरीत आहे. एकीकङे दुष्काळी स्थिती पाणी टंचाईची स्थिती आहे, वादळवार्याने निसर्गामुळे  एकीकङे केळीबागांचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे. अन दुसरीकङे केळीचे झाङे कापुन नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच अङचणीत सापङतांना नजरेस पङत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.