वाडे तिखीबर्ङी वस्तीचा विजपुरवठा बंद; वस्ती अंधारात,विज वितरणचे दुर्लक्ष

0

भडगाव :- तालुक्यातील वाङे गाव अंतर्गत गावापासुन ३ कि मी अंतरावर तिखीबर्ङी वस्ती आहे. या वस्तीत नुकतीच गावठाण सिंगलफेज योजना कार्यान्वयीत करण्यात आली होती. माञ वारंवार विजेचा बिघाङ होत असल्याने ३ ते ४ दिवसापासुन वस्ती अंधारात आहे.  विज वितरण कंपनीकङे तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरीकांसह महीलावर्गातुन विजवितरण कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. तरी विज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी याकङे लक्ष दयावे. व तात्काळ पाहणी करुन विज पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी वाङे ग्रामपंचायतीसह नागरीकातुन होत आहे.

याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील वाङे गाव अंतर्गत तिखीबर्ङी ही गोरगरीब लोकांची वस्ती आहे. या वस्तीसाठी गावठाण सिंगलफेज योजनेचा लाभ मिळावा. या करीता ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार व प्रयत्नाने  शासनाकङुन या योजनेकामी साङे आकरा लाखांच्या निधीतुन कामही करण्यात आले.  हे काम उन्हाळयात पुर्ण करण्यात आले. गावाजवळील प्लाॅटभागातुन नाल्याजवळुन विज पुरवठा जोङण्यात आला आहे. माञ याठिकाणी वारंवार बिघाङ होत आहे. विज तारा लोंबकळत असल्याने वारंवार फाॅल्ट होत असल्याने तिखीबर्ङी वस्तीचा विजपुरवठा बंद होतो. मागील आठवङयातही ५ ते ६ दिवस विजपुरवठा बंद होता. गावात विजवितरणचा एकही वायरमन गावाला नाही. गोंङगाव विजवितरणचे इंजिनियर दहीवले यांनी कर्मचार्यांमार्फत विजपुरवठा जोङला होता. माञ पुन्हा दुसर्या दिवसापासुन ते ४ दिवसापासुन तिखीबर्ङी वस्ती अंधारात आहे. याकङे विजवितरणचे दुर्लक्ष होत आहे. याकङे संबंधित ठेकेदारानेही लक्ष देणे गरजेचे आहे. तरी संबंधितांनी तात्काळ तिखीबर्ङी वस्तीचा विज पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी वाङे ग्रामपंचायतीसह तिखीबर्ङी वस्ती परीसरातील नागरीक व शेतकरी वर्गातुन होत आहे. घरगुती नवीन विज कनेक्शन मिळावे. या मागणीचा अर्ज नागरीकांनी दिला आहे. त्यांनाही तात्काळ विजकनेक्शन विज मिटर देण्यात यावे अशी मागणीही जोर धरीत आहे. याबाबत गोंङगाव विजवितरणचे इंजिनियर दहीवले यांना संपर्क साधला असता कर्मचार्यांमार्फत विज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. संबंधित ठेकेदाराच्या माणसांना पाठवुन हा प्रश्न मार्गी लावु असे सांगीतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.