भडगाव नगरपालिका मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख वाढवली

0

 भडगाव (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या मुळे  नगरपालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांना दोन्हीही कामे कामे करावी लागत असल्याने हरकती व सूचना यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी अधिक कालावधी लागणार आहे अशी मागणी नगरपालिका निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला मुदत वाढवुन मिळण्यासाठी विनंती केली या मुळे अंतिम मतदार याद्या व बूथ निहाय याद्या  प्रसिद्ध होण्याच्या दिनांक बदल करण्यात  आले असल्याचे पत्र निवडणुक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांच्या सहीचे पत्र भडगाव नगरपालिकेला प्राप्त झाल्याची माहिती प्रशासक तथा प्रांत- राजेंद्र कचरे व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली.

 

या पत्रात म्हटले आहे की, प्रभाग निहाय मतदार यादी दि.1 मार्च ऐवजी दि.15 मार्च, दि. 8 मार्च ऐवजी दि.31 मार्च अखेर केंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रार्दृभाव वाढत असल्याने दोन्ही कामे नगरपालिका अधिकारी/कर्मचारी यांना करावे लागत आहे.तसेच प्रारूप मतदार यादी वर घोळ प्रभाग क्र.1 ते 21 चे हरकती  हजारोच्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्याने सदर हकतींचा निराकरण करण्यासाठी दिलेली कालावधीत काम पुर्ण होऊ शकणार नाही.म्हणुन  नगरपालिका निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला मुदत वाढवुन मिळण्यासाठी विनंती केली असता त्यांची विनंती निवडणुक आयोगानी मान्य केली. यामुळे त्यांना आता निवडणुक प्रक्रिया ही पारदर्शक पणे पार पाडण्याचे कालावधी मिळाली आहे.

 

परंतु ईच्छुक उमेदवारांची  डोके दुखी वाढली आहे.कार्य कर्ता सांभाळणे आता त्यांना मोठी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.त्यांनी केलेली आखणीवर विर्जण पडल्याने पुन्हा नविन फळी उभी करण्यासाठी खुप त्रास घ्यावा लागणार आहे. तयार झालेले वातावरणात व पुन्हा जर कोरोना मुळे जर निवडणुक पुन्हा पुढे लोटले गेले तर उमेदवारांना फार मोठा फटका बसेल असेच राजकीय गोट्यात बोलले जात आहे. जर असेच चित्र राहिले तर काही उमेदवारांना पुन्हा वातावरण तयार करण्यात महत्व उरणार नाही. असेच सर्व सामान्य व सुज्ञ जानकार मतदारांन कडून खुलेआम पणे चर्चाचा विषय बनवुन गेला आहे. परंतु निवडणुक आयोगाचा आदेशा प्रमाणेच सर्व निवडणुक प्रक्रिया होतील यांत तिळ मात्र शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.