जिल्ह्यात आज २८८ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल शुक्रवारी तीनशेहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर आज शनिवारी अल्प घट झाल्याचे कोरोना अहवालातून दिसून येत आहे. आज जिल्ह्यात २८८  बाधित रूग्ण आढळून आले आहे. १५६  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच चोपडा  तालुक्यातील एका  रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

आज २८८ हून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकुण बधीताचा आकडा ६० हजार ४७० पर्यंत गेला आहे. त्यापैकी ५६ हजार ८४५  रूग्ण कोरोनामुक्त झाली असून २ हजार २४१  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चोपडा  तालुक्यातील एका  रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १३८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- १३९ , जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-१४ , अमळनेर-८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-३, यावल-५, एरंडोल-२२,  जामनेर-१५, रावेर-२ , पारोळा-४, चाळीसगाव-१७, मुक्ताईनगर-८, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील २  असे एकुण २८८  रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.