भडगावात रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे कारचा अपघात

0

भडगाव (प्रतिनिधी) :- भडगाव शहरातून जाणारा जळगाव-चांदवड महामार्गाचे काम सुरू असून बस स्थानक समोर एक बाजूचा रस्त्याचे काम चालू आहे. दरम्यान, जमिनीपासून दोन फूट रस्ता उंच आहे व दुसरी बाजू खोल असल्याने चारचाकी धारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही व यात कुठलीही निशाणी नसल्याने आज दुपारी बारा वाजे दरम्यान पारोळाकडून-पाचोराकडे जाणाऱ्या मारुती 800 व हुंडई सेंट्रो ह्या गाड्या जात होत्या. या वेळी मारुती 800 ला सेंट्रो गाडीचालक ओव्हरटेक करत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला आर्धी व रोडवर अर्धी अश्या स्तितीत अडकली हे दृष पाहताच बाजूला उभे असलेले नागरिकांनी गडीमधील लोकांना उतरून गाडी उचलून खाली उतरवली म्हणून मोठा अपघात टळला. गाडी जर जास्त स्पीड मध्ये असती तर तिचा मोठा अपघात घडला असता. सदर कांट्रकदराने रस्त्याच्या आजूबाजूला दिसेल असे दर्शक लावावे यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.

रिक्षा कालिपिली व दुचाकी भर रस्त्यावर पार्किंग-

शहरातून जाणारा जळगाव- चांदवड महामार्गाचे काम सुरू असून बस स्थानक समोरील एका  साईडचे काम झाले आहे व वाहतूक सुरू करण्यात आली आहे. समोरील बढे सर कॉम्प्लेक्स असून येथे स्टेट बॅंक, बडोदा बँक, आय डी. बी आय बँक, असून कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात . तसेच काळीपिली, रिक्षा , मालवाहतूक यांना जागा नसल्याने रस्त्यावरच उभी करतात. सध्या पावसाळा असल्याने व रस्त्याचे काम सुरू आहे यात पायदळ चालणाऱ्या नाहक त्रास सहन करावा लागतो व चिखलातून पायवाट काढत जावे लागते. ही व्यवस्था व रस्त्यावर दिशा दर्शक लावावे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.