पिचर्डे ग्राम पंचायतीत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

0

भडगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात पिचर्डे ग्राम पंचायत या वर्षाचा ध्वजारोहण मान आपण सैन्य दलाचे जवानाला देऊ असा ग्राम पंचायत ने निर्णय घेतला व त्यास अनुसुरून ग्राम पंचायत ध्वजारोहणाचा मान सुट्टीवर आलेले भारतीय सैन्याचे जवान पिचर्डे सुपुत्र  व सध्या छत्तीसगड येथे सुभेदार पदावर कार्यरत असणारे जवान शिवाजी आंनदा बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेसुरूवातील सैन्य दलाचे जवान शिवाजी बोरसे यांच्या हातुन  महात्मा गांधी च्या व.भारतमातेच्या प्रतिमेच पुजन करण्यात  हस्ते पिचर्डे ग्रा पंचायत ने हा ऐतिहासिक निर्णय घेतला व गावात पहिल्यांदा च सैन्य दलाच्या  हातुन ध्वजारोहण झाला

सीमेवर फडकणारा तिरंगा हा वाऱ्यामुळे नाहितर सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या श्वासाने फडकतो या ओळीने आज ग्रा पंचायतने कार्यालय चा झेंडा सैन्याचा हातुन फडकला काही दिवसापुर्वी कोल्हापूर, सांगली परिसरात आलेले भंयकर पहापुराचे संकट ओढवले या संकटातुन सामान्य माणसाला ज्या ठिकाणी गावाचा संपर्क तुटला होता व असा ठीकाणी सैन्य दलाचे जवान जिवाची पर्वा न करता त्या ठिकाणी जावून तेथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम अहोरात्र केले असा संकटात सापडलेल्या नागरिकांन पर्यंत जेव्हा जवान पोहोचले तेव्हा नागरिकांना जवान देवदुतासमान भासले या उदात्तभावनेतुन या सेवेतुन उतराही होण्यासाठी आपल्या  जवानाचा उचित ठिकाणी सम्मान करणे आपले कर्तव्य च आहे हे मानुन ग्रा पंचायत ने हा ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला पिचर्डे गावाचे 35 तरूण हे भारतीय सैन्य दलात आज काम करत आहेत अतिशय खडतर प्रवास करत गावातील तरूण आज सैन्यात आहेत यापर्वी ही ग्रा पंचायतने सैन्य दलातील जवानाचा सम्मान केला काही दिवसांपूर्वी सैन्य दलातुन जवान निवुत्त झाले होते तेव्हा ग्रा पंचायत ने सम्मान केला होता ध्वजारोहण करतांना सैन्य दलातील जवान शिवाजी बोरसे यांच्या सह ग्रा पंचायत चे संरपच ,उपसंरपच,सर्व सदस्य यांच्यासह पो.पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, विकासो चे चेअरमन व संचालक मंडळ,शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सह कर्मचारी, गावातील तरूण बांधव,ग्रामस्थ यांच्यासह अनेक संस्थाचे पदधिकारी हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.