पिंपरखेड येथे स्वतंत्र दिनानिमित्त टायगर ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर

0

भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंपरखेड येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून टायगर ग्रुप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आले.

या रक्तदान शिबीरात ४० नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी अजय परदेशी अध्यक्ष टायगर ग्रुप,हर्षल वाघ (उपाध्यक्ष), मयुर पाटील, विजय परदेशी ,मनोज ह्याळींगे,पवन मोरे, राहूल गायकवाड, निलेश परदेशी,अतिष परदेशी आदीसह कार्यकर्ते वप्रार्थमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर, उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.