भडगावात आज तीन वाजेपासून लॉक डाऊन !

0

भडगाव (प्रतिनिधी) : सर्व जगात कोरोनाचा कहर वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन केल्यानंतर आज भडगाव तालुक्यात पोलिस व महसूल प्रशासनाने आज शनिवारी दुपारी तीन वाजे पासून भडगाव शहरासह तालुका हा बंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे व तहसिलदार माधुरी आंधळे यांनी दुपारी तीन वाजेपासून वाहनावरील लाऊड स्पीकर द्वारे बंदचे आवाहन केले आहे. तसेच तालुक्यातील सर्व खेडे कडकडीत बंद करण्यात असून खाजगी वाहन, कालीपिली बंद करण्यात आल्या असून नागरिकांनी घराबाहेर येऊ नये . तसेच घोळका करून फिरू नये असे निदर्शनात आल्यास नियम तोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद..
दवाखाने, मेडिकल, किराणा, दूध डेअरी ही अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद असून दुपारी चारनंतर बस स्टॉप तसेच शहरात शुकशुकाट होता.

महसूल, पोलिस व नगरपालिका प्रशासन ऑन ड्युटी
आज शनिवार दुपारी तीन वाजेपासून शहरासह तालुक्यात महसूल, पोलिस व नगरपालिका प्रशासनाने कोरोणाचा प्रभाव वाढत असुन याबाबत बंदचे आवाहन केले यात तहसिलदार माधुरी आंधळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, स्वप्निल चौव्हण, नितीन रावते, हरीश महाजन, पंढरी राठोड, कैलास गीते, भगवान चौधरी, भगवान बडगुर, कॉ.पा. किशोर पाटील, कॉ.पा. भूषण पाटील यांच्यासह तहसील कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.