जळगावात कारला लागली आग !

0

जळगाव। शहरातील काव्यरत्नावली चौकात रस्त्यावर कार बंद पडल्यानंतर सुरु करीत असताना अचानक कारला आग लागली. ही घटना आज शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यावेळी अग्नीशमन बंबाच्या मदतीने कारला लागलेली आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

याबाबत माहिती अशी की, शहरातील काव्यरत्नावली चौकात अचानक कार (क्रं.एमएच-१७ एजे ३०६९) बंद पडली होती. कार चालक योगेश शिंदे यांनी बंद पडलेली कार सुरू करण्याच्या प्रयत्ना असतांना कारने अचानक पेट घेतला. कारने आग घेतल्याने तरूणाने तत्काळ कारच्या खाली उतरवून अग्नीशमन बंबाशी संपर्क साधला. महाबळ येथील भाऊंचे उद्यानजवळ उभी असलेली अग्नीशमन बंबाने धाव घेत ही आग विझविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.