दहावीचा सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलला

0

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकरकडून विविध प्रयत्न राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्ह्णून सोमवारी दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. सोमवारी 23 मार्च रोजी भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे.

दरम्यान,  कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षांसदर्भात शुक्रवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. 1 ते 8वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार असल्याचं  वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.