सोमवार पासून संपुर्ण जळगाव जिल्हा बंद

0

सोमवार पासून संपुर्ण जळगाव जिल्हा बंद

जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या;

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

जळगाव – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवार 23 पासून जिल्हा पूर्णपणे लॉक डाऊन म्हणजेच बंद चे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि २३ पासून लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र जीवनावश्यक वस्तू व सेवा भाजीपाला औषधालय यांना लागू राहणार नाही.असेही या आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात सोमवार 23 पासून सोने-चांदीचे दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल, सर्व ढाबे, इलेक्ट्रॉनिक दुकाने , झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, वडापाव अंडा बिर्याणीच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, आईस कँडीची दुकाने, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने,वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकान इतर तत्सम दुकाने दिनांक 23 मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तू , किराणा दुकाने, औषधालय ,फळे व भाजीपाला , दूध विक्रीचे दुकाने ,अत्यावश्यक सेवा आणि सेवेतील व्यक्ती, रुग्णालय ,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी , दवाखाने , अंत्यविधी , प्रसारमाध्यमांची कार्यालय या सर्वांना हा आदेश लागू होणार नाही असेही जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.