भंडारा घटनेवर राहुल गांधीकडून हळहळ व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

0

 मुंबई – राज्यात आजची सकाळ ही सर्वांसाठी मन कासावीस करणाऱ्या घटनेने झाली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे नवजात चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केले आहे.

 

राहुल गांधी म्हणाले कि,  महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मी करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.