ब्रिटनहून जळगावात आलेले ते सात जण ‘या’ ठिकाणी सापडले

0

जळगाव : ब्रिटनच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेले सात जण जळगाव जिल्ह्यात आले असून, त्यांचा शोध घेतला आहे. त्यांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत.

 

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंग्लंडमधील विमानसेवा २३ डिसेंबरपासून बंद केली आहे. विमानतळावरही विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला आहे.

 

ब्रिटन प्रवासाची पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेच्या मदतीने सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत सात जणांची माहिती मिळाली आहे. त्यात सर्वाधिक चार जण हे भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथील आहेत. त्याचप्रमाणे चाळीसगाव येथील २ आणि जळगाव शहरातील १ एका व्यक्तीचा समावेश आहे. यातील एकातही करोनाची लक्षणे आढळली नाहीत. हे सर्व जण आठवडाभराच्या कालावधीत ब्रिटनहून मायदेशी परतले आहेत. खबरदारी म्हणून या सर्वांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.