जळोद ग्रामपंचायत सदस्यांनी आ.अनिल पाटील यांची घेतली भेट

0

अमळनेर (प्रतिनिधी) –तालुक्यातील जळोद येथील ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशुतोष काळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी गौरव करण्यात आला, आमदार अनिल पाटील यांनी जळोद गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची नवनिर्वाचित सदस्यांना हमी दिली

जळोद ग्रामपंचायत निवडणुकीत  बिनविरोध नवनिर्वाचित सदस्य भारती शशिकांत साळुंखे, कल्पना ज्ञानेश्वर चौधरी, विलास पंढरीनाथ देशमुख, बेबी सुरेश चौधरी, दीपक भाईदास सोनवणे, भारती बापूराव सावळे, कल्पना जव्हारलाल भोई, कु मयुरी सुनील बाविस्कर, वत्सला पंडित भिल आदी सदस्य उपस्थित होते यावेळी बिनविरोध निवडणूक राबविण्यात प्रक्रिया घेणारे ग्रामस्थ शशिकांत साळुंखे, हरिष कोळी, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल साळुंखे, हिम्मत भोई, धनंजय पाटील, राजेंद्र देशमुख, दीपक पाटील, काशीनाथ कोळी, बापूराव कोळी, भगवान भोई आदीही यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.