विद्यार्थ्यांना जिल्ह्यातून सर्वात जास्त नोकरी देण्याचा प्रयत्न : ईझाक पॉल

0

भुसावळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देवुन पालकांच्या स्वप्नपुर्तीसाठी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयत्नांना यश मिळत आहे, कोविड १९  च्या काळात संपुर्ण जगाने या विश्वव्यापक  महामारीचा सामना केला संपुर्ण शैक्षणिक  क्षेत्रही त्यात सामिल आहे. मात्र अशा संकटातही आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन स्वावलंबी बनविण्यासाठी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आपले सातत्य कायम ठेवत इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शनची सुरुवात केली आहे अशी माहिती ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.ईझाक पॉल यांनी दिली आहे. कराराची माहिती देतांना ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातुन सर्वात जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न सेल द्वारे केला जाईल. उद्योग संस्था संवाद (Industry Institute Interaction) ट्रेनिंग अँड सेल विभागातर्फे द्वितीय वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण राबवण्यात येणार असल्याचे प्रा.पॉल यांनी कळविले आहे. डॉ.राहुल बारजिभे, प्रा.राम अग्रवाल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक खडसे, प्रा. गौरव टेम्बुर्णिकार, डॉ. श्रीकांत चौधरी, प्रा.मनीष माटा उपस्थित होते.

डेल, इन्फोसिस, हुवाई, टीसीएस सोबत करार: डॉ.राहुल बारजिभे

इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागातर्फे विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात येईल, करिअर, प्लॅनिंग, त्यांच्या निरीक्षणानुसार प्रशिक्षण आणि नोकरीची तयारी करून घेतली जाईल. नॉलेज, स्कील आणि अँटिट्युड यावर विशेष लक्ष देणार आहोत आयटी इंडस्ट्रीची वाढती गरज लक्षात घेऊन संगणक प्रोग्रामिंग भाषा शिकविण्याचे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. संस्थेत 500 संगणकाचे सेंटर आहेत. कंपन्याच्या ऑनलाईन चाचणीची सोय संस्थेत केली जाणार आहे. या दरम्यान महाविद्यालय आणि उद्योग जगताशी संबंधित डेल, इन्फोसिस, टीसीएस, हुवाई कंपन्यांशी सामंजस्य करार झालेला असून ट्रेनिंग विद्यार्थ्यांनी पूर्ण करीत यशस्वी वाटचाल सुरू केली आहे, असे डॉ.राहुल बारजिभे यांनी सांगितले.

देशभरातून पस्तीस उद्योजक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार: डॉ.आर.पी.सिंह

देशभरातून पस्तीसच्या आसपास उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले नामवंत व्यक्ती सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मान्यवर मंडळी आपली मते मांडणार आहेत. उद्योग जगतात होत असलेले बदल आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येईल जेणेकरून त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील यावर उहापोह होणार आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. २२ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.