बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला; गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील बोरी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज दि. २६/८/ २०२१ बुधवार रोजी सकाळी ८ वाजता बोरी धरणाचे ०१ दरवाजे ०,१५ मी उघडण्यात आले असून बोरी नदीपात्रात ४५१ क्युसेक्स पुराचे पाणी प्रवाह सोडण्यात आले आसल्याची मीहिती पाटबंधारे विभागा मार्फत देण्यात आली.

बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जिवित वा वित्त हाणी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.