बोदवड येथील विनोद पाडर राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित

0

बोदवड – महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथील जनसेवक विनोद पाडर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.हा कार्यक्रम मुंबई पनवेल येथे दि.9 रोजी पार पडला.

विनोद पाडर हे बोदवड येथील रहिवासी ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी बोदवड तालुक्यातील महत्त्वपुर्ण विषयात हात घातलेला आहे.बोदवड शहरातील रस्ता दुभाजकासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता याची दखल घेत प्रशासनाने रस्ता दुभाजक त्त्वरीत बसवीले,नंतर पाडर यांनी वीर हनुमान शिरसाळा रस्त्याकरीता 4 दिवस आमरण उपोषण केले आणि शिरसाळा रस्त्याच्या कामास सुरवात झाली.बोदवड नगर पंचायत बोगस भरती मोर्चा काढून रद्द केली ,81गावांची ओडीओ योजने करीता आमरण उपोषण करून जिल्हा परिषदला प्रस्ताव पाठवला व आज त्या कामास सुरुवात झाली.

विनोद पाडर यांनी जनहीतार्थ बरीच आंदोलन केली या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार पुरोगामी संघ व महाराष्ट्र शासन यांच्या विद्येमाने राज्य स्तरीय पुरस्काराने संमानीत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.